पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. मका पिकास पाणी देण्याच्या अवस्था पुढीलप्रमाणे आहेत. 1. रोपावस्था – पेरणीनंतर सुरुवातीचे 25 ते 30 दिवस बियाण्याची उगवण होऊन रोपाची वाढ होण्यासाठी जमिनीत या अवस्थेत वाफसा असणे गरजेचे आहे. 2. वृद्धिकाळ – उगवणीनंतर 35 ते 40 दिवसांचा या अवस्थेमध्ये झाडाच्या खालून पाचव्या पेऱ्यापर्यंत दुय्यम मुळे निघतात व ती जमिनीत रुजतात. त्यामुळे झाडाला बळकटी येते. या अवस्थेत झाडाची जोमदार वाढ होऊन पानांची पूर्णपणे निर्मिती होते. 3. फुलोरा अवस्था – उगवणीपासून 45 ते 60 दिवसापर्यतचा हा काळ आहे. तूरा वरच्या टोकापासून झुपक्यासारखा येतो. यामधून पुंकेसर बाहेर पडण्याची क्रिया या १५ दिवसापर्यत सुरू राहते. 4. कणसे लागण्याचा कालावधी – तुरा बाहेर पडल्यानंतर 2-3 दिवसात प्रथम कणीस बाहेर पडण्यास सुरूवात होते. या कणसातून स्त्रीकेसरबाहेर पडतात व या स्त्रीकेसरावर तु-यामधून निघणारे पुंकेसर पडून त्यांचे संयोगीकरण होते व बीजधारणा होते. कणीस निघण्याचा व संयोगीकरणाचा कालावधी साधारणपणे 50 ते 70 दिवस पर्यतचा असतो. बीजधारणा झाल्यावर कणसात दाणे भरण्यास सुरूवात होते. 5. दुधाळ अवस्था – दाणे भरताना प्रथमत: दाणे पक्क न होता हुरडा होण्याचा काळ. हा काळ साधारणत 4 ते 5 आठवड्याचा असतो. या काळात झाडाच्या शुष्क भागात सक्रियवाढ (85% पर्यत) होते. 6. दाणे पक्व होण्याचा काळ – दुधाळ अवस्थेनंतर दाणे पक्क होण्याकरीता 15ते 20 दिवस लागतात. दाणे पक्क होण्याची चिन्हे म्हणजे दाण्याच्या खालच्या भागाला काळा थर तयार होतो. दाणे पक्क झाल्यानंतर कणसे पिवळी होताच कापणी करू शकतो. वरील माहितीच्या आधारे मका गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी पिकामध्ये काळजीपूर्वक पाणी व्यवस्थापन करावे. संदर्भ:- Sheticart हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
-: sheticart